Ad will apear here
Next
‘एस्सर’ने उभारला सर्वात मोठा ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स
मुंबई, विशाखापट्टणम : एस्सर वैझॅग टर्मिनल लिमिटेडने (ईव्हीटीएल) नव्याने कार्यान्वित केलेला २४ एमटीपीए वैझॅग आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स देशाला समर्पित करण्यात आला असून, या प्रकल्पाचे उद्घाटन रस्ते वाहतूक व महामार्ग, शिपिंग व जल संसाधने मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

‘वैझॅग आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स हा प्रकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय संपत्ती आहे. सरकारने बंदरप्रणित विकासाचे पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ असे ‘एस्सर’चे संचालक प्रशांत रुईया यांनी सांगितले.

अद्ययावत कार्गो हाताळणी उपकरण असलेल्या आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्समध्ये भारतीय बंदरांमध्ये सर्वात जलद व्हेसल टर्नअराउंड टाइम असेल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रकल्पाची कार्गो हाताळणी क्षमता २४ एमटीपीएपर्यंत वाढवण्यात आली आहे. आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्समध्ये आता वैझॅग बंदराच्या आउटर हार्बरवर, २० मीटर खोलीपर्यंत, दोन लाख डीडब्लूटीपर्यंत सुपर केपसाइज व्हेसल बर्थ करणे शक्य आहे.

आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स पर्यावरणपूरक करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. यांत्रिकीकरण व पर्यावरणाचे शाश्वत संरक्षण या दृष्टीने जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींवर भर दिल्याने डस्ट एमिशन व स्पिलेजमध्ये लक्षणीय घट झाली आहे व त्यामुळे कार्बनचे प्रमाण कमी झाले आहे व बंदरावर काम करण्यासाठी परिस्थिती अधिक सुधारली आहे. ‘ईव्हीटीएल’ने संपूर्ण ९.५ किमीचे कन्व्हेअर जाळेही सक्षम केले आहे व पीएलसी ऑटोमेशनमध्ये अपग्रेड केले आहे, त्यामुळे विक्रमी कार्गो हाताळणी करता येईल.

‘ईव्हीटीएल’ने ३० वर्षे कालावधीसाठी डिझाइन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्स्फर (डीबीएफओटी) पद्धतीने २०१५मध्ये हा प्रकल्प हाती घेतला. आयर्न ओअर हँडलिंग कॉम्प्लेक्स सर्व हवामानांसाठी, डीप ड्राफ्ट सुविधा असून, ती चीन, जपान व कोरिया यासह झपाट्याने वाढत्या आग्नेय आशियाला सेवा देण्यासाठी सज्ज आहे. या प्रकल्पाने कार्गोसाठी छत्तीसगड, ओडिशा व झारखंड येथून विशेष रेल्वे कनेक्टिविटी निर्माण केली आहे.

एस्सर पोर्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजीव अग्रवाल म्हणाले, ‘या प्रकल्पामुळे पूर्व किनाऱ्यावरील निर्यातकांना लहान टर्नअराउंड टाइम्स व घटलेली फ्रेट कॉस्ट असा फायदा होईल. या सुविधेमुळे निर्यात व किनारवर्ती वाहतूक या दोन्हींना मदत होईल, तसेच सागरमला उपक्रमाचा हेतूही साध्य केला जाईल. हा विस्तार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही वैझॅग बंदर अधिकाऱ्यांचे आम्ही आभारी आहोत.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZTGBQ
Similar Posts
वडपे-ठाणे हायब्रिड अॅन्युइटी प्रकल्पाची पायाभरणी मुंबई : महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील ठाणे ते वडपे या २३ किलोमीटरच्या टप्प्यातील म्हणजेच महामार्गावरील ५३९ किलोमीटर ते ५६३ किलोमीटर या चौपदरी मार्गाचा हायब्रिड अॅन्युइटी मॉडेलने विकास करून तो आठ पदरी करण्याचे काम, पायाभूत विकास क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी, एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स करणार आहे
‘इंटरनेटच्या लोकशाहीकरणासाठी विशेष तंत्रज्ञान धोरणाची गरज’ मुंबई : ‘इंटरनेटचे लोकशाहीकरण करण्यासाठी विशेष तंत्रज्ञान धोरणाची आवश्यकता असून, इंटरनेट क्रांतीचा सर्वाधिक फायदा विविध भारतीय भाषांचा वापर करणाऱ्या समाजाला होईल,’ असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
गडकरी यांची सलमान खान, राणा कपूरशी भेट मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला यशस्वीरित्या चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे देशभर चालू असलेल्या ‘संपर्क से समर्थन’ अभियानाअंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत चित्रपट पटकथा लेखक सलीम खान, अभिनेते
‘नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था मजबूत’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने उचललेल्या नोटबंदी व जीएसटीच्या पावलांमुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे व काळ्या पैशाला चाप लागला आहे. ज्या लोकांचे काळ्या पैशाचे व्यवहार होते ते लोक व त्यांना पाठिंबा देणारे राजकारणी यामुळे दुःखी झाले असले, तरी हे निर्णय देशहिताचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language